ऐन श्रावणात साबुदाणा, शेंगदाण्याचे भाव कडाडले, उपवासाचे पदार्थही महागलेधाराशिव: श्रावण महिना हा व्रतवैकल्याचा महिना या महिन्यात उपवास मोठ्या प्रमाणावर केले जातात, त्यातच यंदा अधिक श्रावण आल्याने उपवासाचा कालावधी वाढला आहे . परिणामी उपवासासाठी लागणाऱ्या पदार्थांचे भाव वाढले आहेत, एकीकडे साबुदाण्याचे भाव वाढले असताना, दुसरीकडे शेंगदाणा भगर साबुदाणा याचेही भाव वाढले आहेत.
श्रावण महिन्यामध्ये उपवासाला फराळ म्हणून विशेष करून साबुदाणा, खिचडी ,राजगिरा, वरीचा भात हे पदार्थ खाल्ले जातात. तसेच बटाटे ,शेंगदाणे, फळे, साबुदाणा, राजगिरा, रताळे याचाही समावेश उपवासाच्या आहारामध्ये केला जातो. परिणामी बाजारात उपवासाची निगडित पदार्थाची मागणी वाढली आहे, त्यामुळे या पदार्थाचे भाव सध्या वाढलेली दिसून येत आहे. त्यातच खास उपवासासाठी लागणारे पदार्थ बाजारामध्ये उपलब्ध झाले आहेत, अवघ्या दोन आठवड्यात उपवासाच्या पदार्थांमध्ये भाव वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
यामध्ये साबुदाण्याचे भाव हे 20% ने वाढले आहेत, श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी 65 रुपये किलो मिळणारा साबुदाणा, आता 75 रुपये किलो प्रमाणे मिळतो आहे. तर पंधरा दिवसापूर्वी 140 रुपये किलो प्रमाणे मिळणारा राजगिरा आता दोनशे रुपये किलो झाला आहे. याचबरोबर उपवासाच्या पदार्थांमध्ये जास्त करून शेंगदाण्याचा वापर केला जातो, त्यामुळे सध्या शेंगदाणा दीडशे रुपये किलो प्रमाणे विकला जात आहे. प्रामुख्याने वापर होणारा साबुदाणा, शेंगदाणा, वरी, राजगिरा या वापराच्या उपवासाच्या वस्तूमध्ये 20 ते 25 रुपयांनी दरवाढ झाली आहे. मागील वर्षी वीस रुपयांना मिळणाऱ्या राजगिरा लाडूचे पाकीट यंदा पाच रुपयांनी महागले आहे, एकंदरीत यंदा श्रावण महिन्यामध्ये उपवासाच्या पदार्थांमध्ये दरवाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
0 Comments