Hot Posts

6/recent/ticker-posts

जालना जिल्ह्यातील लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ, उळे येथे सकल मराठा समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन

जालना जिल्ह्यातील लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ, उळे येथे सकल मराठा समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव


सोलापूर : जालना जिल्हयातील अंतरवली सराटी येथे सकल मराठा समाज  आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचा निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील उळे येथे,दिनाक,३ सप्टेंबर २०२३ रोजी निषेध करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, व तहसीलदार मार्फत सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की,मराठा समाजाचे समाजसेवक असून दोन दिवसापूर्वी जालना जिल्हयात एक दुर्दैवी घटना घडली असून अतिशय शांततेत चालणा-या मराठा समाजाच्या आरक्षण मागणीच्या आंदोलानावर आणि आंदोलनकर्त्यावर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला असून सदर लाठीचार्ज करत असताना महिला, लहान मुले, यांचा देखील विचार करण्यात आला नाही, तरी सदर प्रकरणी दोषींवर तात्काळ अत्यंत कडक कारवाई करून सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करून आंदोलन करणा-या कार्यकर्त्याना संरक्षण देऊन लवकरात लवकर मराठा आरक्षण दयावे असे, दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


यावेळी आयोजक मनसे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष  मनोज बचुटे,मनोज गुंड,उत्तम शिंदे,आप्पा धनके,यशपाल वाडकर , राजाभाऊ वाडकर , चंदू चव्हाण , शंकर वाडकर , विक्रम मिटकरी , सुधीर चौघुले, सागर पवार शिवा मोहिते , राहूल ढोकळे, अजित शिंदे , योगेश गोवर्धन,नाना गोवर्धन सर्व यांच्यासह सकल मराठा समाज बांधव सोलापूर जिल्हा व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments