सकल मराठा समाजाच्यवतीने उद्या नळदुर्ग बंदसह रास्ता रोको आंदोलन
नळदुर्ग: जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलन कर्त्यावर अमानुषपणे पोलिसांनी लाठी चार्ज केल्याच्या निषेधार्थ तसेच मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने तुळजापुर तालुक्यातील नळदुर्ग सह परिसरातील गावातून शुक्रवारी दिनांक 8 सप्टेंबर रोजी नळदुर्ग शहर बंद ठेवून राष्ट्रीय महामार्ग बसस्थानका समोर सकाळी साडेअकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनामध्ये नळदुर्गसह,अणदुर, जळकोट, शहापूर, दहिटणा ,गुजनुर, वागदरी , येडोळा ,ईटकळ ,बाभळगाव, शिरगापुर ,केशेगाव , बोळेगाव, कुन्सावळी, नंदगाव ,लोहगाव, सलगरा दिवटी ,किलज, बोरगांव, मुरटा, चिकुंद्रा, होर्टी , येवती चिवरी ,उमरगा (चिवरी), या गावातील मराठा समाजाचे नागरिक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनाची सुरुवात किल्ला गेट ते मुख्य बाजारपेठ मार्गे बस स्थानकापर्यंत मोर्चा निघणार आहे. याबाबतचे निवेदन बुधवारी दिनांक ६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांना देण्यात आली आहे.
0 Comments