शासकीय कामात अडथळा करणाऱ्यां दोघांवर नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल
नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार दत्तात्रय कुंभार यांना कर्तव्य बजावत असताना गंधोरा येथील दोघांनी शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळाली सविस्तर माहिती अशी की राजेंद्र मच्छींद्र कोनाळे, दत्तात्रय विनायक भोसले, दोघे रा. गंधोरा, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दत्तात्रय माणिकराव कुंभार, वय 39 वर्षे,पोलीस अमंलदार/437 ने पोलीस ठाणे नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव हे तुळजापूर येथील समन्स बजावणी करुन नळदुर्ग हद्दीतील समन्स बजावणी करणेकामी जात असताना तहान लागली म्हणून पाण्याची बाटली घेण्यासाठी दि.15 रोजी नागझरी पाटील येथील विकास धाबा येथे थांबले असता यातील नमुद आरोपीतांनी तु धाब्यावर शासकीय मोटार सायकल का आणलास असे कारण काढून फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यावरुन दत्तात्रय माणिकराव कुंभार यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 353, 34अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
0 Comments