अणदुर येथे घरासमोर लावलेली मोटरसायकल लंपासप्रतिकात्मक फोटो
धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील अंदुर येथील प्रशांत सुतार यांची एचएफ डीलक्स या कंपनीची घरासमोर लावलेली मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसाकडून मिळाली सविस्तर माहिती अशी की प्रशांत दिलीप सुतार, वय 28 वर्षे, रा. महादेव मंदीर अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 35,000₹ किंमतीची एचएफ डिलक्स मोटरसायकल क्र एमएच 25 एएन 6652 ही. दि.14.09.2023 रोजी 23.00 ते दि. 15.09.2023 रोजी 07.00 वा. सु. सुहास कबाडे यांचे घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी प्रशांत सुतार यांनी दि.16.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
0 Comments