तुळजापूर येथे नगरपरिषद कार्यालयात कार्यालयीन अधिक्षक वैभव पाठक यांच्या हस्ते,मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण
तुळजापुर : नगरपरिषद कार्यालयात कार्यालयीन अधिक्षक श्री.वैभव पाठक यांच्या शुभहस्ते सकाळी ७-०० वा.मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न झाले. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज पुतळ्यास व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा जागेस पुष्पमाला अर्पण करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असलेल्या हुतात्माच्या समाधीस्थळी व भवानी रोडवरील हुतात्मा स्मारक येथे पुष्पमाला अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमात श्री.रणजीत कांबळे, श्री.सज्जन गायकवाड, श्री.दत्ता साळूंके, श्री.जयजयराम माने, श्री.महादेव सोनार, श्रीम.प्रफुल्लता बरुरकर, श्रीम.अरुणा रोकडे, श्री.बालाजी जाधव, श्री.दत्ता चोपदार, श्री.दत्ता लोंढे तसेच श्री.पंडीत जगदाळे, श्री.किशोर साठे, श्री.अंबादास पोफळे इ.उपस्थित होते.
प्रतिनिधि रूपेश डोलारे धाराशिव
0 Comments