अकलुज येथील सदाशिवराव माने विद्यालयात हिंदी व अभियंता दिन एकत्रित साजरा....
अकलूज प्रतिनिधी - अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात मुख्याध्यापक अमोल फुले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात हिंदी दिन व अभियंता दिन साजरा करण्यात आला. भारत हा एक वैविध्यपूर्ण देश आहे जिथे सर्व लोक वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या चालीरीतींचे पालन करतात. दरम्यान देशातील ७७ टक्के लोक हिंदी बोलतात, समजतात आणि लिहितात. हिंदी ही जगातील तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा देखील आहे. तसेच तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी विकासामुळे प्रत्येक देश विकसित होत असतो. त्या विकासासाठी अभियंता हे पद अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. सध्या प्रत्येक औद्योगिक क्षेत्रात अभियंता कार्यरत असल्यामुळे पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान विकास शक्य झालेला आहे. महान भारतीय अभियंता मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त म्हणजे १५ सप्टेंबर या दिवशी अभियंता दिवस साजरा केला जातो. सर्वप्रथम विद्यालयात कै. काकासाहेब, आक्कासाहेब व डॉ. विश्वेश्वरया मोक्षगुंडम यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विद्यालयातील झाकीर सय्यद व शिवाजी थिटे यांनी हिंदी दिनाचे महत्त्व सांगितले.
तसेच विद्यालयाचे उप मुख्याध्यापक दत्तात्रय घंटे यांनी दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी साजरा होणारा हिंदी दिवस हा भारतीय संस्कृतीची कदर करण्याचा आणि हिंदी भाषेचा सन्मान करण्याचा एक मार्ग आहे. १९४९ मध्ये हा दिवस, भारताच्या संविधान सभेने हिंदीला देशाची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारले. विद्यालयातील माजी विद्यार्थी इंजिनिअर महेश ढगे, ज्ञानेश्वरी सांगडे यांचा अभियंता दिनाचे औचित्यसाधत सन्मान करण्यात आला हिंदी दिनाचे औचित्य साधून हिंदी विषयाचे अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोनाली धायगुडे, केतकी गाजरे व सानिया तांबोळी तर लटके हिने अभियांत्रिकी दिना निमित्त आपले विचार व्यक्त केले.
उपप्राचार्य संजय शिंदे यांनी विश्वेश्वरय्या हे म्हैसूरमधील कावेरी नदीवर कृष्णा राजा सागर धरणाच्या बांधकामाचे मुख्य अभियंता होते. हे धरण त्यावेळी आशियातील सर्वात मोठे जलाशय होते. त्यांच्या असाधारण कामगिरीमुळेच भारतातील जलसंपत्ती विकास शक्य झाला. जलसिंचन, नदी – बंधारे, धरण अशा विविध प्रकारच्या प्रकल्पांतील त्यांचे योगदान मोलाचे ठरले होते. त्यासाठी १९५५ साली “भारतरत्न” या भारतातील सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. अशी माहिती दिली. सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन साठे सर व पोपट निंबाळकर यांनी केले तर आभार लोखंडे मॅडम यांनी मानले.
उपसंपादक: विलास भोसले
0 Comments