Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा 'वॉक फॉर नेशन' रॅलीमध्ये सहभाग

श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा 'वॉक फॉर नेशन' रॅलीमध्ये सहभाग


धाराशिव : यावर्षी मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी जिल्हयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याच कार्यक्रमांतर्गत शहरात आज दिनांक १५ सप्टेंबर, २०२३ रोजी 'वॉक फॉर नेशन' रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील एन.एस.एस., एन.सी. सी., स्काउट गाईडचे खेळाडू,  विद्यार्थी, शिक्षकासह एकूण २०० जणांनी सहभाग नोंदवला.
 ही रॅली सकाळी ८ वाजता  छत्रपती शिवाजी महाराज चौक - डॉ. बाबासाहेव आंबेडकर चौक - श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे दाखल झाली. या रॅलीमध्ये विद्यालयातील एन. एस. एस. चे कार्यक्रमाधिकारी श्री. एस. व्ही. पाटील सर, क्रिडा शिक्षक श्री. ए. ए. लोमटे सर, श्री. रोहित घोडके सर, प्रा. ए. जे. खुने सर, प्रा. सौ. जाधव मॅडम, प्रा. सौ. वाडकर मॅडम, प्रा. सौ. शेळके मॅडम, प्रा. सौ. देशमुख मॅडम, प्रा. वाघ सर, प्रा. वाघमारे सर यांनी सहभाग नोंदवला. या रॅलीसाठी प्राचार्य श्री.एस. एस. देशमुख सर,  उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments