माणुसकी फाउंडेशनच्या वतीने मोरजाई विद्यालयात गुरुजनांचा सन्मान
नातेपुते प्रतिनिधी : डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त मोरजाई विद्यालय मोरोची या शाळेमध्ये माणुसकी फाउंडेशन मोरोची या संस्थेच्या वतीने विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचा सन्मान फेटा हार व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणुसकी फाउंडेशन चे अध्यक्ष सोमनाथ दडस होते यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांचा व कर्मचाऱ्यांचा सत्कार माणुसकी फाउंडेशनच्या उपाध्यक्ष सोनाली माने व संचालिका सोनाली दडस व शितल बाबर यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी मोरोची गावचे उपसरपंच रणजीत सूळ, माजी उपसरपंच अनिल सुळ, ग्रामपंचायत सदस्य सुनील सुळ, राजन सूळ, किशोर सुळ, मोहन झेंडे, माजी सरपंच संतोष गोरेे, बाळू गोरे, शाळेचे मुख्याध्यापक सूर्यवंशी उपस्थित शिक्षकांच्या सन्मान प्रसंगी माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ दडस म्हणाले जो ज्ञानी असतो त्याला समाजात मान सन्मान असतो ज्ञानाने माणूस सुसंस्कृत एक चांगला माणूस बनतो अशाप्रकाारे मुलांना ज्ञान देण्याचे काम शिक्षक करीत असतात अशा ज्ञान देणाऱ्या गुरुजनांचा सन्मान झालाच पाहिजे यावेळी मोरजाई विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत माने यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक शितोळे यांनी केले.
0 Comments