Hot Posts

6/recent/ticker-posts

माता रमाई भवन आमराई बारामती येथे आपला दवाखाना (शहरी आरोग्यवर्धिनी) सुरू युवा पॅंथर संघटनेच्या मागणीला यश वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे युवा पॅंथरच्या वतीने केले स्वागत

माता रमाई भवन आमराई बारामती येथे  आपला दवाखाना (शहरी आरोग्यवर्धिनी) सुरू युवा पॅंथर संघटनेच्या मागणीला यश वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे युवा पॅंथरच्या वतीने केले स्वागत

बारामती प्रतिनिधी : बारामती येथील माता रमाई भवन आमराई येथे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र) आमराईतील लोकांच्या सोयीसाठी चालू करण्यासाठी बारामती नगरपरिषद व जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली होती परंतु काही आज्ञातांकडून सदर आपला दवाखान्याच्या इमारतीमधील फर्निचर लाईटच्या वायरिंग ची पाण्याच्या नळाची मोडतोड केल्यामुळे आपला दवाखाना तिथे चालू होत नव्हता परंतु भारतीय युवा पॅंथर संघटनेच्या पाठपुराव्यामुळे व तेथील लोकांच्या सोयीसाठी दवाखाना त्याच ठिकाणी लवकर चालू व्हावा अशी गौरव अहिवळे यांची तळमळ असल्याने व बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी मनोज खोमणे यांच्या सहकार्याने सदर ठिकाणी दवाखाना चालू करण्यात आला दवाखाना चालू झाल्यानंतर आपला दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल सोमवंशी, आरोग्य सेविका उषा भोसले, आरोग्य सेवक प्रशांत सालगुडे, अटेंडन्स समीर खरात, हाउसकीपिंग सुप्रिया कांबळे यांचा भारतीय युवा पॅंथरच्या  वतीने सत्कार करण्यात आला आमराई मधील गोरगरीब लोकांना शासनाने सुरू केलेला हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (शहरी आरोग्यवर्धिनी) याचा फायदा होणार असून आमराई मधील लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान गौरव आहिवळे यांनी केले .

यावेळी भारतीय युवा पॅंथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव आहिवळे , संपर्कप्रमुख शुभम गायकवाड, शहराध्यक्ष निखिल (भाई) खरात, शहर संघटक समीर खान , पीपल्स रिपब्लिकन पार्टी बारामती तालुकाध्यक्ष आनंद भाऊ लोंढे , सामाजिक कार्यकर्ते पिंटू भाऊ गायकवाड , अनुराज कीर्तिकर पत्रकार विलास भोसले  उपस्थित होते

Post a Comment

0 Comments