तुळजापुर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे आनंदाचा शिधा वाटप
तुळजापुर: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी व गणेश चतुर्थी निमित्त आनंदाचा शिधाचे तीर्थ बुद्रुक येथे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा महाराष्ट्र शासन विभाग यांच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील तीर्थ बुद्रुक येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे(आजित दादा पवार गटाचे ) युवा नेते व ग्रामपंचायत सदस्य तालुकाउपाध्यक्ष मनोज (भैय्या )माडजे यांच्या हस्ते तीर्थ बुद्रुक येथील लाभार्थ्यांना व ग्रामस्थांना आनंदाचा शिधावाटप करण्याचा शुभारंभ दि,१७ रोजी करण्यात आला. यावेळी प्रफुल्ल शेटे, महादेव मोरे, आजित माडजे, पुढंलीक मोरे, रेखा कांबळे ,संगिता पासले, मिरा कांबळे ,शशीकला माडजे ,तसेच तीर्थ बुद्रुक येथील लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापुर
0 Comments