तुळजापुर तालुक्यातील सिंदफळ येथे जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ,सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

सिंदफळ ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

तुळजापुर : जालना जिल्हयातील अंतरवली सराटी येथे सकल मराठा समाज आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचा निषेधार्थ तुळजापुर तालुक्यात सर्वत्र तीव्र पडसाद उमटत आहेत. गावोगावी बंद, रस्ता रोको निषेध आंदोलनाच्या माध्यमातून या लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. तालुक्यातील सिंदफळ येथे,७ सप्टेंबर रोजी अंतरवली सराटी येथे सकल मराठा समाज आंदोलकावर झालेल्या अमानुष लाठीचार्जचा निषेध करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की,मराठा समाजाचे समाजसेवक असून जालना जिल्हयात एक दुर्दैवी घटना घडली असून अतिशय शांततेत चालणा-या मराठा समाजाच्या आरक्षण मागणीच्या आंदोलानावर आणि आंदोलनकर्त्यावर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला असून सदर लाठीचार्ज करत असताना महिला,लहान मुले, यांचा देखील विचार करण्यात आला नाही, तरी सदर प्रकरणी दोषींवर तात्काळ अत्यंत कडक कारवाई करून सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करून आंदोलन करणा-या कार्यकर्त्याना संरक्षण देऊन लवकरात लवकर मराठा आरक्षण दयावे असे, दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी धैर्यशील आबा कापसे, बबलू पैलवान धनके, दिनेश धनके, यांच्यासह सिंदफळ व पंचक्रोशीतील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच या आंदोलनात धैर्यशील आबा कापसे बबलू पैलवान धनके सरपंच अर्जुन राजे कापसे उपसरपंच बाळासाहेब डोंगरे दादा घाटशिळे श्री हनुमंत जाधव शशिकांत कापसे चिटू धनके अॅड शुभम कापसे सचिन नवगिरे आनंद आले राजभाऊ बागवान रसूल शेख बिलाल इनामदार मेसा मेंबर सुदर्शन पांढरे गणेश धनके उमेश धनके मारुती मिसाळ बंटी मिसाळ नानासाहेब ऐकंडे आदीसह गावातील जास्तीत सकल मराठा समाज उपस्थित होता .
0 Comments