श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेजमध्ये बोलक्या बाहुल्याच्या माध्यमातून मतदार जनजागृती
धाराशिव: श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेज येथे दिनांक २७ सप्टेंबर रोजी बोलक्या बाहुल्याचा मतदार नोंदणी प्रबोधनपर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमात उदयसिंह पाटील सर यांनी महाविद्यालयीन युवक-युवतींनी तात्काळ मतदार नोंदणी करावी तसेच आपल्या संपर्कातील सर्वांची मतदार नोंदणी होईल याबाबत मतदार साक्षर होवून मतदार नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस धाराशिवचे तहसिलदार डॉ. शिवानंद बिडवे सर यांनी मतदार जनजागृतीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अप्पर तहसिलदार निलेश काकडे सर, नायब तहसिलदार जी.एस. स्वामी सर तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील सर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. एस. व्ही. पाटील सर आणि अठरा वर्ष वय पूर्ण झालेले विद्यार्थी-विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डी.वाय. घोडके सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री. देशमुख सर, उपप्राचार्य श्री. घार्गे सर, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील सर यांचे सहकार्य लाभले.
0 Comments