अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक तिसरा गणपती
सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकापैकी तिसरा गणपती उजवी सोंड असणारा हा एकमेव गणपती. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. मधु व कोटभ या दैत्यांचा वध श्री विष्णू ने केला असा उल्लेख पुराण कथेमध्ये आढळतो. या ठिकाणी विष्णूला सिद्धी प्राप्त झाली म्हणून या गणपतीला सिद्धिविनायक आणि या परिसराला सिद्धटेक या नावाने ओळखले जाते मंदिर उत्तराभिमुख असून गाभारा लांबी रुंदीने भरपूर मोठा आहे. व गाभाऱ्यात शेंदूर लावून उजव्या सोंडेची शेंदूर लावलेली मनमोहक सिद्धिविनायकाची मूर्ती आहे तसेच मंडपही मोठा प्रशस्त आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र सूर्य गरुड यांच्या प्रतिमा आहेत. हे स्थान महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असून दौंड पासून 19 किलोमीटर अंतरावर आहे. तर राशीन पासून 142 किलोमीटर अंतरावर आहे दौंडहुन गेल्यास वाटेत भीमा नदी लागते ती ओलांडायला होड्या असत, मात्र सध्या पूल झाला आहे. अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेचे गणपती मंदिरे आहेत. ही आठही अष्टविनायकाची मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी स्थित आहेत.
⛔ श्री गणेश उत्सव विशेष ⛔
0 Comments