धाराशिव शहर व परिसरातील असंख्य युवकांचा भाजपात प्रवेश
धाराशिव: भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विचाराने व कार्याने प्रेरित होऊन धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय नेतृत्व तथा आमदार राणाजगजितसिंहजी पाटील साहेब,सुजितसिंहजी ठाकूर साहेब, भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य साहेब तसेच युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या कर्तुत्वावर व नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर व परिसरातील असंख्य युवकांनी आमदार राणाजगजिसिंह पाटील साहेब यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
यावेळी आमदार राणा दादांनी पक्ष वाढीसाठी सर्व युवकांनी समाजात जाऊन कार्य करावे.तसेच लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष कार्यकर्त्यांनी पाठपुरवठा करावा तसेच सरल ॲप सारखे पक्ष कार्य सर्वांनी करावे असे सांगितले.
यावेळी श्री.व्यंकटेश कोळी,अमीर सौदागर,अब्दुलबारी सौदागर,इमरान सौदागर, इरफान सौदागर, वाहेद सौदागर,अरबाज सय्यद,मुकेश भोकरे,सागर माने, मौला सौदागर,चेतन काटे,प्रशांत शेटे, आदित्य कुंभार,भीमाशंकर साळुंखे, शुभम सवणे,सुमित कोंढारे,अमित लाड,प्रतीक कुरणे,अरविंद भुसनर, ओम ढोकळे,पांडुरंग तुपे आदी तरुणांचा प्रवेश झाला.
या प्रवेशासाठी आत्मनिर्भर संयोजक सचिन लोंढे यांनी पुढाकार घेतला.याप्रसंगी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल नाईकवाडी ,सूर्याजी गायकवाड, ओंकार देवकते उपस्थित होते.
0 Comments