Hot Posts

6/recent/ticker-posts

घरकुलची माहिती सांगत नसल्याने संतप्त महिलेकडून ग्रामसेविकेस मारहाण|A village servant was beaten up by an angry woman for not telling about the house

घरकुलाची माहिती सांगत नसल्याने संतप्त महिलेकडून ग्रामसेविकेस मारहाण

वाशिम : शासनाच्या घरकुल योजनेविषयी वारंवार विचारणा करूनही समाधान होत असल्याने संतप्त महिलेकडून ग्रामसेविकेस मारहाण केल्याची घटना दि,६ सप्टेंबर रोजी मालेगाव तालुक्यातील अनसिंग येथे घडली असून याप्रकरणी ग्रामसेविकाच्या तक्रारीवरून मंगलबाई बाळू मुळे या महिलेविरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळाली सविस्तर माहिती अशी की मालेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सुदी व अनसिंग ग्रामपंचायतीत सतीका महादेव पांडे राहणार मुंगळा या महिला ग्रामसेविका कार्यरत आहे . दरम्यान अनसिंग येथील महिला मंगलबाई बाळू मुळे या महिलेने घरकुल विषयी माहिती विचारली या संबंधीतीची माहिती दिल्यानंतर समाधान न झाल्याने  त्यांनी शासकीय कामात अडथळा आणत शिवीगाळ करत थापडा बुक्क्यांनी मारहाण केली. अशा आशयाची तक्रार ग्रामसेविका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार दत्तात्रेय आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सारिका नारखेडे या करीत आहेत .

Post a Comment

0 Comments