Hot Posts

6/recent/ticker-posts

रेशन दुकानदाराकडून लाच मागणारा नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात , दर महिन्याला करायचा दुकानदाराकडून हप्ता वसूली

रेशन दुकानदाराकडून लाच मागणारा नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात , दर महिन्याला करायचा दुकानदाराकडून हप्ता वसूली 

धाराशिव: शहरातील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा नायब तहसीलदार, राजाराम केलूरकर हा धान्याच्या मागणी पत्रावर सही करण्यासाठी रेशन दुकानदाराकडून प्रति महा तीन हजाराची लाच घेत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापला आहे. लाच मागितलीचा कारणावरून केलूरकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत  मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे तत्कालीन नायब तहसीलदार राजाराम केलूरकर ते सध्या उमरगा येथे कार्यरत आहेत.(वय.५६) (राहणार लक्ष्मी धाम कॉलनी लातूर) यांनी धाराशिव येथील रेशन दुकानदाराला त्यांच्या धान्य मागणी पत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी प्रति दुकानदारास प्रति महिना 1000 रुपयाची मागणी केली होती. याबाबत तीन दुकानदारांनी लाच लचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मे महिन्यामध्ये तक्रार केली होती. या तक्रारीनंतर लाच लचपत प्रतिबंधक पथकाने त्यांचे कर्मचारी व त्यांच्या पंचाला पाठवून या तक्रारीची  पडताळणी केली असता, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार केलूरकर यांनी तक्रारदार व इतर दोन साथीदारांना तीन महिन्याचे प्रत्येकी तीन हजार रुपये याप्रमाणे एकूण 9000 हजार रूपये लाचेची मागणी केली.

याबाबत एसीबीच्या पथकाने 19 मे ते 4 सेप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये केलूरकर यांनी सदरची रक्कम पंचा समक्ष मागणी केल्याची दिसून आली. दरम्यान केलूरकर यांची उमरगा तहसील कार्यालयामध्ये बदली झाली आहे परंतु सदरची लाचेची मागणी यांचा पंचा समक्ष मागणी केल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ॲक्शन मोड मध्ये येत नायब तहसीलदार राजाराम केलूरकर यांना ताब्यात घेऊन आनंदनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ही पोलीस अधीक्षक, संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक, विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.सापळा पथककात पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, विशाल डोके, नागेश शेरकर यांनी केली.

लोकसेवक अथवा त्यांच्यावतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर कार्यालय 02472 222879 व टोल फ्री क्रमांक1064 या नंबरवर संपर्क साधावा असे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव यांनी आवाहन केले आहे

Post a Comment

0 Comments