Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर येथे महंत योगी मावजीनाथ बुवा,महंत इच्छागिरी,महंत व्यंकट अरण्य यांच्या हस्ते आ.राणा जगजितसिंह पाटील यांचा सत्कार.

तुळजापुर  येथे महंत योगी मावजीनाथ बुवा,महंत इच्छागिरी,महंत व्यंकट अरण्य यांच्या हस्ते आ.राणा जगजितसिंह पाटील यांचा सत्कार.


तसेच तुळजाभवानी जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाचे आ. पाटील यांना निवेदन



तुळजाभवानी जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाचे आ. पाटील यांना निवेदन

तुळजापुर प्रतिनिधी:  तालुक्याचे आमदर राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर शहरासाठी भरघोस निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल महंत योगी मावजीनाथ बुवा,महंत इच्छागिरी,महंत व्यंकट अरण्य,यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,तसेच तुळजाभवानी जिल्हा सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्यादित धाराशिव यांनी निवेदन दिले,या निवेदनात असे नमूद केले आहे की,तुळजाभवानी जिल्हा सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्यादित धाराशिव या जिल्हास्तरीय संस्थेमार्फत दुध संकलन वितरणाचे कामकाज सुरु आहे,मात्र सध्याच्या नैसर्गीक परिस्थितीमुळे शेतकरी चारा, पाणी, व पशुखाद्य अभावी मेटाकुटीला आलेला आहे.  धाराशिव हा आकांक्षीत जिल्हा असुन शेतकरी कष्टक-यांना दुग्ध उत्पादनाशिवाय दुसरा ठोस पर्याय नाही मात्र सध्याच्या आवर्षनामुळे जिल्हयात चारा पाणी व खुराकाची टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हयात सरासरीपेक्षा फारच कमी पाउस झाल्यामुळे जनावरे जगवणेचे फार मोठे आव्हान शेतक-यांपुढे उभे आहे. परिणामी जिल्हयात शेतकरी शेतमजुरांचे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.

तरी या टंचाईचा विचार करुन जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात तहसिल कार्यालयामार्फत शेतक-यांना चारा (मुरघास / कुट्टी) उपलब्ध करुन शेतक- यापर्यंत पोहोच करण्याची व्यवस्था करावी तसेच सर्व शेतक-यांचे ५ लाखापर्यंतचे कर्ज माफ करावे जेणेकरुन शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी होईल व त्यांना दिलासा मिळेल अन्यथा पशुधन झपाटयाने कमी होवून शेतकरी शेतमजुर कंगाल होईल कृपया या सर्व बाबींचा विचार करुन त्वरीत चारा ( मुरघास / कुट्टी) उपलब्ध करुन देवून कर्ज माफी द्यावी असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे,या निवेदनावर चेअरमन बाळासाहेब शिंदे यांची स्वाक्षरी आहे.यावेळी सत्यवान साळवे,किशोर गंगने,रामेश्र्वर वैद्य,सुनील नकाते,एच एम लोमटे,उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments