Hot Posts

6/recent/ticker-posts

इंदुरीकर महाराजही मराठा आरक्षणाच्या लढ्यात, पुढील पाच दिवस किर्तन सेवा बंद

इंदुरीकर महाराजही मराठा आरक्षणाच्या लढ्यात, पुढील पाच दिवस किर्तन सेवा बंद

अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी  आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असताना त्यात आणखी एका मोठ्या नावाचा समावेश झाला आहे. प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यासाठी पुढच्या पाच दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 

महाराष्ट्रातून आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना मोठ्या प्रमाणावर सर्वच थरातून पाठींबा मिळत आहे.यात शेतकरी वर्ग.सर्व पक्षाचे कार्यकर्ते विद्यार्थी मजूर कर्मचारी इतर समाज महिला व वृद्ध पुरुष मंडळी एक ना अनेकजण यात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत. याताच आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले निवृत्ती इंदुरीकर( देशमुख) महाराज यांनी देखील मराठा आरक्षणाच्या आंदोलनात उडी घेतली आहे.व मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे.इंदुरीकर महाराज हे आज पासून सलग पाच दिवस कोणतेही कार्यक्रम न करण्याचा व तसेच कीर्तन न करण्याचा निर्णय रविवारी करमाळा येथे आयोजित कार्यक्रमात केला.

Post a Comment

0 Comments