नवरात्रोत्सव आरोग्य जनजागृती सायकल मोहिम श्रीक्षेत्र आळंदी ते श्रीक्षेत्र तूळजापुर
तुळजापुर: दिवसात किमान एक तास व्यायाम करुया ..आपलं ह्रदय नेहमी सुरक्षित ठेऊया या संकल्पनेतून गोल्डन सायकलिस्ट ग्रुप आळंदीतून आरोग्य जनजागृती मोहिमेची सुरुवात दि. 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता दिघी येथून झाली.
दिवसभरातला एक तास तरी आपल्या शरिराच्या व्ययामासाठी दिला पाहिजे . तरच आपले शरिर सुधरूड आणि निरोगी राहिल.
हडपसर , दौंड , इंदापूर , कुरकुंब , सोलापूर , तुळजापूर आदि प्रमुख शहरांमध्ये आरोग्य जनजागृती करुन 320 कि.मी.अंतर पूर्ण केले .या आरोग्य जनजागृती मोहिमेमध्ये सायकलपटू दत्ता घुले , जितेंद्र मिश्रा , मधूकर मोरे , वैभव पाटिल , विनायक तार्वे , दिलीप येलपले , चिंतामणी मांडगुळकर आदी सायकलपटू सहभागी झाले होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापुर
0 Comments