Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय ओबीसी महासंघ ओबीसी ऐक्य, धाराशिव ते तुळजापुर पदयात्रा

धाराशिव:  राष्ट्रीय ओबीसी महासंघ ओबीसी ऐक्य, धाराशिव ते तुळजापुर पदयात्रा

धाराशिव : छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथून दि,२२ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघ ओबीसी ऐक्य, धाराशिव ते तुळजापूर श्री तुळजाभवानीच्या मंदिरापर्यंत पदयात्रा काढण्यात आली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने  धाराशिव ते तुळजापूर ओबीसी ऐक्य पदयात्रा काढली,या पदयात्रेच्या निमित्ताने सर्व ओबीसी बांधव शासनाला विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये ओबीसी मधील सामाजिक आर्थिक शैक्षणिक आदी क्षेत्रा मध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे.आई तुळजाभवानी चरणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी कडे साकडे घालण्यात आले,की ओबीसी बांधवांसह सर्व जाती  धर्मातील प्रवर्गातील  बांधवांना न्याय  मिळावा,बिहार राज्याच्या धर्तीवर जात निहाय जनगणना व्हावी अशी शासनाला सदबुद्धी दे जेणेकरून या राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी. महाराष्ट्रातला बंधू भाव कायम रहावा कुठल्याही प्रवर्गावर अन्याय होऊ नये ओबीसी समाजाच्या संविधानिक मागण्या मान्य करावेत ओबीसीवर मध्ये आज सामाजिक अस्वस्थतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे, या परिस्थितीमध्ये तोडगा काढत असताना कुठल्याही प्रवर्गावर अन्याय होऊ नये,म्हणून या पदयात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र  शासनाला विनंती करण्यात आली, शासनाने आमच्या संविधानिक मागण्या ज्या जातनिहाय जनगणना असो, ओबीसी आरक्षण  असो. पदोन्नतीतील आरक्षण असो राजकीय आरक्षण असो शैक्षणिक आरक्षण असो सामाजिक आरक्षण असो या सर्व बाबींमध्ये शासनाने सर्व प्रवर्गाचा सर्व जाती धर्माचा विचार करून राज्यांमध्ये निर्माण झालेली अशांततेची परिस्थिती या ठिकाणी ताबडतोब निर्णय घेऊन यावर मार्ग काढावा यासाठी डॉक्टर बबनराव तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही धाराशिव ते तुळजापूर अशी पदयात्रा काढण्यात आली.

या पदयात्रेमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब पांचाळ ,युवा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन बोराडे मराठवाडा विभागीय अध्यक्ष  दिपक जाधव, धाराशिव जिल्हाध्यक्ष शिवानंद कथले, मराठवाडा उपाध्यक्ष लक्ष्मण माने,  धनंजय राऊत,वैजिनाथ गुळवे,  महाराष्ट्र जिल्हा लातूर युवा अध्यक्ष दिलीप पिनाटे, तेली समाज जिल्हाध्यक्ष रवी कोरे आळणीकर, आदी सह ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments