मराठा आरक्षणासाठी कळंब तालुक्यातील ईटकुर येथे आजपासून आमरण उपोषण सुरु
कळंब /प्रतिनिधी :मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळावे याकरिता मनोज जरांगे हे आमरण उपोषण करत असून त्यांना समर्थन म्हणून कळंब तालुक्यातील ईटकुर येथे 15 युवकांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली असून तेथील ग्रामपंचायतच्या 9 सदस्यांनी देखील राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे तर गावातील विद्यार्थ्यांनी परिक्षेवर बहिष्कार टाकला आहे.शासनाने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी व आंदोलन दिवसेंदिवस वाढत चालली आहे मात्र शासन या कडे कधी लक्ष देणार असा प्रश्न निर्माण होत आहे.
ईटकुर येथील अभयसिंह दत्तात्रय आडसुळ ,लक्ष्मण सुबराव आडसुळ, सचिन आश्रुबा गंभीरे,दादाराव माणिक मोटे, विजयसिंह विलासराव पाटील,रणजित बिभीषण देशमुख,संतोष बापूराव थोरात,शुभम किसनराव राखुंडे,पंडित भाऊसाहेब देशमुख, चंद्रसेन सर्जेराव आडसुळ , प्रणेश भीष्मचार्य गंभीरे, अशोक लिंबराज आडसुळ हे तरुण आमरण उपोषणासाठी बसले आहेत.
0 Comments