तुळजापुर येथे नवरात्र महोत्सव व महाआरोग्य शिबिरात १ लाखाच्या वर भाविकांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ
धाराशिव दि 29: तुळजापूर येथे 27 ते 29 ऑक्टोबर 2023 या कालावधीत पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.श्री शारदीय नवरात्र महोत्सव -2023 तुळजापूर या शहरात विविध मार्गावर 12 ऑक्टोबरपासून भाविकांना आरोग्य सेवा देण्यात आली.तुळजापूर येथे नवरात्र महोत्सव आणि महाआरोग्य शिबिरात आज 28 ऑक्टोबरपर्यंत 1 लाख 14 हजार 325 भाविकांनी आरोग्य सेवांचा लाभ घेतला. यामध्ये 48 हजार 615 महिला आणि 65 हजार 710 पुरुष भाविकांचा समावेश आहे.
नवरात्र महोत्सवादरम्यान 12 ऑक्टोबरपासून 6 हजार 184 भाविकांना आयसीयू हॉस्पिटलद्वारे उपचार देण्यात आले.54 हजार 361 भाविकांना प्रथमोपचार केंद्रामार्फत प्रथमोपचार करण्यात आले.दुचाकी रुग्णवाहिकेद्वारे 3 हजार 437 भाविकांना प्रथमोपचार करण्यात आले. आरोग्यदूतामार्फत 11 हजार 511 भाविकांना, रुग्णवाहिकांमार्फत 2586 रुग्णांना उपचार व 335 संदर्भित सेवा देण्यात आल्या. आंतररुग्ण सेवा 564 रुग्णांना देण्यात आल्या. यात्रा मार्गावरील 359 पाणी स्त्रोतांची नियमित तपासणी करून शुद्धीकरण करण्यात आले.
तुळजापूर येथे सोलापूर मार्गावरील घाटशीळ पायथा येथे 27 ऑक्टोबरपासून ते 29 ऑक्टोबर या कालावधी सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिरात तुळजापूर येथे येणाऱ्या भाविकांना तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य तपासणी, हाडांची,डोळ्यांची, दंत,हृदयरोग,रक्तक्षय,कान,नाक, घसा तपासणी,चष्म्यांचे वितरण, इसीजी व रक्तगट तपासणी इत्यादी सुविधा देण्यात येत आहे.
27 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजतापासून सुरू करण्यात आलेला महाआरोग्य शिबिरामध्ये एकूण 35 हजार 557 भाविकांनी शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये 19 हजार 782 पुरुष व 15 हजार 575 महिला भाविकांचा समावेश आहे.
7034 भाविकांवर विशेषतज्ञ डॉक्टरांकडून उपचार
विशेषज्ञ डॉक्टरांमार्फत एकूण 7034 भाविकांवर उपचार करण्यात आले.3276 भाविकांना चष्मे वाटप करण्यात आले. 2226 भाविकांची रक्त तपासणी,सोनोग्राफी, टू डी, इको, ईसीजी व इतर चाचण्या करण्यात आल्या. डेंटल व्हॅन व मोबाईल मेडिकल युनिटद्वारे एक्स-रे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची तपासणी इत्यादी सुविधांचा 519 भाविकांना लाभ घेतला.
0 Comments