लातुर जिल्हा कारागृहात रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर सेंट्रल यांच्या सहकार्यातून तसेच कीर्तनकार ह.भ.प श्री निलेश महाराज झरेगांवकर किर्तन यांचा सोहळा संपन्न
लातुर : दिनांक १६ ऑक्टोबर रोजी लातूर जिल्हा कारागृहात रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर सेंट्रल यांच्या सहकार्यातून तसेच प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प श्री निलेश महाराज झरेगांवकर यांच्या भक्तिमाधुर्यात प्रासादिक कीर्तनसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अनेक तुरुंगातील आठवणी झरेगांवकर महाराजांनी बंदिबांधवांच्या समोर व्यक्त केल्या, क्षणिक क्रोधामुळे आपल्या हातुन अनावधानाने गुन्हा घडलाय आणि त्या गुन्ह्याची शिक्षा आपण या कारागृहात भोगतोय.
पण यातुन मुक्ती मिळविण्यासाठी नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे इतकं सोपं साधन जगद्गुरू तुकोबारायांनी आपल्याला सांगितले आहे.
तुम्हीतरी गुन्हा केलाय म्हणून इथे शिक्षा भोगताय, पण मीतर कुठलाही गुन्हा न करता एकएका तुरूंगात पाच पाच तास घालवतोय. पण मी जेव्हा जेव्हा तुरूंगात हा वेळ घालवत आहे तेव्हा तेव्हा तुरूंगात चैतन्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. मघ आपण असा प्रयत्न करण्याचा कधी विचार केलाय का.?
पाच हजार वर्षापुर्वी श्रीकृष्णाचा जन्म याच कारागृहात झाला होता, त्यामुळे तो माझ्या अगोदर तुमचा म्हणजे बंदीबांधवांचा सखा आहे. आपल्या सख्याचे चिंतन करा तो नक्कीच यातुन आपल्याला तारेल, अश्या सोप्या भाषेत लातूर जिल्हा कारागृहातील कैद्यांना झरेगांवकर महाराजांनी हा कीर्तनभक्तीचा अलौकिक ब्रम्हरसाचा काढा दिला.
या अभुतपुर्व सोहळ्यासाठी लातुर जिल्हा कारागृहाचे पोलीस अधीक्षक मा.श्री नागनाथ सावंत साहेब, जिल्ह्याचे जेष्ट पत्रकार मा.श्री जयप्रकाशजी दगडे साहेब,रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर सेन्ट्रल चे अध्यक्ष
श्री.शैलेशजी गुंडरे, राघवेंद्र ईटकर, गणेश अग्रोया, अक्षय गुरव, हेमंत रामढवे, श्रीधर खैरे, नागेश स्वामी, गिरीष ब्याळे, महेश खनगे, आशिषजी जगदाळे, औदुंबर महाराज खलाटे तसेच वैराग्याचे महामेरू संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या फडावरील गुणिजन गायक,वादक, वारकरी,टाळकरी उपस्थित होते.
0 Comments