Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर नवरात्रौत्सवात ११ चोरट्यांना ठोकल्या बेड्या

तुळजापुर येथे नवरात्र महोत्सवात ११ चोरट्यांना ठोकल्या बेड्या
स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी 

धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) - तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सव सुरू असून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दररोज वाढत आहे. या गर्दीचा फायदा घेत काही चोरट्यांनी त्यांच्या मौल्यवान वस्तू चोरण्याचा सपाटा लावला आहे. हे रोखण्यासाठी 

दि.१६ व १७ ऑक्टोबर असे दोन दिवस तुळजापुर येथील यात्रेमध्ये पायी पेट्रोलींग करीत असताना चोरी करण्याच्या उद्देशाने संशयितरीत्या यात्रेमध्ये फिरत असलेल्या २ पुरुष व ९ महिला अशा ११ चोरट्यांना ताब्यात घेवून त्यांच्यावर सीआरपीसी कलम १०९ प्रमाणे कारवाई करुन बेड्या ठोकल्या आहेत. ही दमदार कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि.१६ रोजी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील सुमन कन्हैय्या मानकर (वय- ३०) व इतर ४ महिला तर कर्नाटक राज्यातील बिजापूर इंडी येथील श्रीकांत हरिदास होसमन (वय- २२ वर्ष) व इतर एकास अटक केली आहे. तसेच दि.१७ ऑक्टोबर रोजी सोलापूर येथील सलगर वस्ती (सेटलमेंट एरिया) अंजली मारूती लोंढे (वय- २२ वर्ष) रा. सलगर वस्ती( सेटलमेंट एरिया) व इतर १ महिला व सपोनि मनोज निलंगेकर हे पथकासह फिरत असताना २ संशयितरीत्या फिरणाऱ्या महिलांना अटक केली आहे.

ही कामगिरी पोलीस पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गद्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव ,   सपोनी मनोज निलंगेकर यांचेसह पोहेकॉ हुसेन सय्यद, पोना अमोल चव्हाण, पोकॉ बलदेव ठाकूर, मपोकॉ रविंद्र आरसेवाड, रंजना होळकर, पो ना जावेद काझी, पोह प्रकाशअवताडे,शौकत पठाण व मपोका होळकर यांनी केली.

प्रतिनिधी रूपेश डोलारे धाराशिव 

Post a Comment

0 Comments