लातुर तहसीलदारपदी सौदागर तांदळे यांची नियुक्ती
लातुर: मागील सात महिन्यापासून रिक्त असलेल्या लातूर तहसीलदार पदी सौदागर तांदळे यांच्या नियुक्तीचे आदेश 3 ऑक्टोबर 2023 रोजी मंत्रालयात निघाले. त्यानंतर तांदळे यांनी बुधवारी दिनांक चार रोजी प्रभारी तहसीलदार गणेश सरोदे यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचा सत्कार ही करण्यात आला तांदळे यांच्या रूपाने तब्बल सात महिन्यानंतर लातूरला तालुका दंडाधिकारी मिळाले आहेत. लातूर तहसील कार्यालयाची तत्कालीन तहसीलदार स्वप्निल पवार यांची 14 एप्रिल 2023 रोजी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली, त्यानंतर औसा तहसीलदार भरत सूर्यवंशी, शोभा पुजारी व दोन महिन्यापासून या पदाचा कार्यभार नायब तहसीलदार गणेश सरोदे यांच्याकडे होता.
आज पर्यंत कधीच लातूरची तहसीलदार पदरिक्त राहिली नव्हते, इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे. याच काळात अंबाजोगाईची तहसीलदार बिपिन पाटील व पाथरीचे तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या स्पर्धा लागली होती. अखेर या स्पर्धेत तांदळे यांनी बाजी मारली असून 3 आक्टोंबर रोजी त्यांची लातूर तहसील कार्यालयात तहसीलदार म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे. बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी नूतन तहसीलदार सौदागर तांदळे यांनी प्रभारी तहसीलदार गणेश सरोदे यांच्याकडून पदभार स्वीकारला त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
0 Comments