Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रेम विवाहाला आई-वडिलांची परवानगी आवश्यक,नानव्हा ग्रामपंचायत ठराव! राईट टू लव्ह संघटनेकडून ग्रामपंचायतीस नोटीस|love marraige permission mother and father

प्रेम विवाहाला  आई-वडिलांची परवानगी आवश्यक,नानव्हा ग्रामपंचायत ठराव! राईट टू लव्ह संघटनेकडून ग्रामपंचायतीस नोटीस


गोंदिया: जिल्ह्यातील सालकेसा तालुक्यातील नानव्हा ग्रामपंचायतीने प्रेम विवाह करणाऱ्या जोडप्यांना घरच्यांची परवानगी असेल तरच विवाह नोंदणी करणार असा ग्रामसभेत ठराव पारित केला होता. ही बातमी समाज माध्यमातून पोहोचल्यानंतर लगेच राईट टू लव्ह या संघटनेतर्फे नानव्हाचे सरपंच पदाधिकारी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात प्रेम विवाहाला विरोध करण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे राईट टू लव्ह या संघटनेतर्फे ठरावाचा कडाडून निषेध करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील नानव्हा ग्रामपंचायत ने आई-वडिलांची प्रेमविवाहाला संमती नसेल तर त्याची विवाह नोंद करण्यास नकार दिला आहे. असा बेकायदेशीर आणि असंवैधानिक ठराव करण्याच्या ग्रामपंचायतीला कोणताही अधिकार नाही, आपले संविधान आपल्याला जोडीदार निवडण्याचा अधिकार देतो, मग तो जोडीदार कोणत्याही जाती धर्मातील असला तरी त्याच सरकारचाही आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन म्हणून योजना असताना या ठरावामुळे संविधानाचे दिलेल्या अधिकाराची उल्लंघन होत आहे. नानव्हा ग्रामपंचायतीने केलेला ठराव बेकायदेशीर असल्यामुळे आम्ही आमच्या राईट टू लव्ह या संघटनेमार्फत नानव्हा ग्रामपंचायत इस कायदेशीर नोटीस पाठवली आहे. हा ठराव नोटीस मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत रद्द करण्यास सांगितले आहे. तसेच नोटीस नमूद कालावधीमध्ये ठराव रद्द न केल्यास ्रामपंचायतीच्या सर्व सभासदावर व अधिकार्‍यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याची नोटीसद्वारे कळवले आहे.

प्रेम विवाहला घरच्यांची परवानगी आहे असा ठराव ग्रामसभेत बहुमताने घेतला आहे. यावर शासनाचे मार्गदर्शन मागितले आहे त्यानुसार पुढील निर्णय घेणार आहे. राईट टू लव्ह संघटनेचा कॉल सरपंचाला आला होता पण अद्याप कागदपत्रे अशी कोणती नोटीस नानव्हा  ग्रामपंचायत कार्यालयाला प्राप्त झाली नाही.

 शिवाजी राठोड ग्रामसेवक ग्रामपंचायत नानव्हा .


आमचा प्रेमविवाहाला विरोध नाही पण असे करताना मात्र दोघांच्या घरच्यांची परवानगी आवश्यक करण्याचा ठराव घेण्यात आला असून त्यावर शासनाचे मार्गदर्शन मागितले आहे राईट टू लव्ह संघटना पुणे येथील रोशन मोरे यांनी कॉल करून नोटीस बजावली असल्याची माहिती दिली आहे.

गौरीशंकर बिसेन सरपंच ग्रामपंचायत नानव्हा. 



 


 


Post a Comment

0 Comments