धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ५२ रोडवरील वाहने आडवून मारहान करुन दरोडा घालणारी टोळी २४ तासात गजाआड.
स्थानिक गुन्हे शाखेने घेतले दोघांना ताब्यात, सात साथीदार प्रसार
धाराशिव - सोलापूर धुळे महामार्गावरील नरसिंह कारखान्या जवळी लघुसंखेला गेलेल्या चालकास बेदम मारहाण मारहाण करून त्यांच्या कंटेनर मधील नव्या कोऱ्या सात मोटरसायकली पळून गेल्याच्या घटना 4 नोव्हेंबर च्या रात्री घडली होती . याप्रकरणी गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या भागात तळ ठोकून दोन दरोडेखोर गुन्हेगारांना अटक केली आहे त्यांच्याकडून सर्व दुचाकी ताब्यात घेण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसाकडून मिळाली सविस्तर माहिती अशी की नयाससोद्दीन शाहिद खान, वय 28 वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा. मुहरैया, ता. नौगढ जि. सिध्दार्थनगर राज्य उत्तरप्रदेश हे कपुर डिझेल्स कंपनीचे कंटेनर मध्ये टि.व्ही. एस कंपनीच्या आपाची मॉडेलच्या 40 गाड्या भरुन म्हैसुर राज्य कर्नाटक येथुन जयपुर, राजस्थान येथे घेवून जात होते दरम्यान दि.04.11.2023 रोजी रात्री 07.30 वा. सु. इंदापुर शिवारातील बंद असलेल्या नरसिंह साखर कारखान्या समोर एनएच 52 रोडवरील सर्व्हीस रोडलगत कंटेनर उभा करुन नयाससोद्दीन खान हे बाथरुमला जावून आले व गाडीत बसले असता आनोळखी आठ ते नऊ व्यक्तींनी नयाससोद्दीन खान यांना लाथाबुक्यांनी व काठ्यांनी मारहाण केली आणि गळ्याला चाकु लावून नयाससोद्दीन खान यांचे खिशातील रोख रक्कम 27,000₹ तसेच कंटेनर मधील टि.व्ही. एस कंपनीच्या आपाची मॉडेलच्या 7 मोटरसायकल प्रति मोटरसायकल 90,742 ₹ प्रमाणे असे एकुण 6,62,194₹ माल जबरदस्तीने काढून घेतला आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी- नयाससोद्दीन खान यांनी दि.05.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे गुरनं 329/2023 कलम 395, 397 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक श्री. नवनीत कॉवत यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे व पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे पथकास योग्य ते मार्गदर्शन करुन सदर पथके रवाना केली. सदर गुन्ह्याच्या घटनास्थळाची पाहाणी करुन गुन्हा करण्याच्या पध्दतीवरुन सदरचा गुन्हा खामकरवाडी पारधी पिढी येथील सराईत गुन्हेगार यांनी केल्याची खात्री झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी खामकरवाडी येथे जवून तेथील आरोपी नामे- 1)दिपक उर्फ बबड्या रमेश काळे, 2) दादा लाला पवार दोघेही रा. खामकरवाडी ता. वाशी जि. धाराशिव यांना ताब्यात घेवून त्यांचे कडे नमुद गुन्ह्याविषयी सखोल चौकशी केली असता सदर गुन्हा आम्ही दोघांनी व आमचे इतर 7 साथीदारांनी केला आहे, अशी त्यांनी कबुली दिली. सदर आरोपीच्या ताब्यातुन नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या टि.व्ही. एस कंपनीच्या आपाची मॉडेलच्या 7 मोटरसायकली प्रति मोटरसायकल किंमत 90,742 ₹ प्रमाणे असा एकुण 6,62,194₹ चा मुद्देमाल जप्त करुन आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही कामी वाशी पोलीस ठाणे येथे हजर केला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक श्री. नवनीत कॉवत यांचे आदेशावरुन व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर, शैलेश पवार, पोलीस उप निरीक्षक श्री. संदीप ओहोळ, सफौ/ वलीउल्ला काझी, पोलीस हावलदार शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, विनोद जानराव, फराहान पठाण, समाधान वाघमारे, पोलीस नाईक- नितीन जाधवर, बबन जाधवर, पोलीस अमंलदार/ रविंद्र आरसेवाड, चालक पोलीस हावलदार/ सुभाष चौरे, महेबुब अरब, चालक पोलीस अमंलदार/ नितीन भोसले यांचे पथकाने केली आहे.
0 Comments