पौष्टीक तृणधान्य - ज्वारी लागवड पंचसुत्री श्री सतिश कचरे मंडळ कृषि अधिकारी नातेपुते
नातेपुते प्रतिनिधी: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात आपण आंतराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष -२०२३ साजरे करत आहोत यामध्ये या तृणधान्याचे कमी खर्चात उत्पादन वाढविणेसाठी प्रयत्न प्रचार ,प्रसार , प्रसिध्दी देणे काळाची गरज आहे . या वर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस पडले मुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही . महात्मा फुले कृषि विद्यापीठ शास्त्रज्ञ यांनी केलेले संशोधन व निष्कर्ष ज्वारी उत्पादन वाढ पंचसुत्रीचा अवलंब करून उपलब्ध साधन सामुग्रीचा वापर करून कमी खर्चात उत्पादन वाढविणे साठी पंचसुत्री अवलंब सध्याची गरज आहे.
१ जमिन प्रकार पाणी उपलब्धता नुसार आधिक उत्पन्न देणाऱ्या सुधारित वाणांची लागवड करणे . भारी जमिनीसाठी बागायत व जिरायत जमिनीसाठी फुले यशोधा , फुले वसुधा , मालदाडी , परभणी क्रांती या वाणाची निवड करावी . हलकी जमिन फुले माऊली , फुले अनुराधा बागायत व जिरायत साठी अधिक उत्पन्न देणारे वाण आहे. मध्यम जमिन साठी फुले सुचित्रा ,फुले चित्र या जातीची निवड करावी बागायत साठी फुले रेवती फुले माऊली या वाणाची निवड करावी. वरील प्रमाणे वाणांची निवड केली तरी २५ % उत्पादनात वाढ होते .
२- पेरणीपूर्व जमिनित ओलावा वाढविणे - ज्वारी प्रामुख्याने जिरायत पीक म्हणून लागवड केली जाते . बीयाची उगवण व प्राथमिक वाढीच्या आवस्थेत पुरेशे पाणी साठी / ओलाव करणेसाठी पेरणी पूर्व पेरणी करावयाच्या क्षेत्रात १० मीटर वर सफाट वाफे करून शेताची बांध बंधिस्ती केली तर मुलस्थांनी जल संधारन होऊन ३० % पर्यंत उत्पन्नात व चाऱ्यात वाढ होते
३- पेरणीनंतर पाणी साठवन व जलसंधारन - प्रामुख्याने बहुतांश क्षेत्रात जिरायत पीक लागवड होत असलेमुळे पेरणीनंतर पीकाच्या वाढीला पाणी उपलब्ध होणे साठी पेरणीवेळी बी.बी.एफ पेरणीनंतर लगेच मृत सरी व रुंद वाफे केल्यांनी पडणाऱ्या पावसाचे पाणी संधारण होऊन धान्य व चारा उत्पन्नात २०% वाढ दिसून आली आहे .
४- एकात्मिक अन्न दव्ये व्यवस्थापन - आपेक्षित उत्पादनासाठी माती परिक्षाणावर आधारित १०० किलो नत्र २ हप्ता मध्ये ५० स्फुरद व पालाश पेरणी वेळी व २० किलो झिंक सल्फेट व फेरस सल्फेट कंपोस्ट खतात मिसळून दिल्याने व २चांडी पाभरीने बियाणे व खत पेरणी केल्याने उत्पादनात १५% वाढ झाल्याची दिसून आली आहे.
५- एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन - बीज प्रक्रिया ३०० मेश ४ ग्रैम स्मट रोगासाठी + इमिडाक्लोप्रीड - शुट फलाय + कार्बेन्डेझीम २ग्रॅम बुरशीजन्य रोग व तदनंतर २५० ग्रॅम ऍझोटॉक्टर + २५० ग्रॅम पी.एस.बी. ची प्रति १० किलो बियाणे केल्याने रोग व किड प्रतिबध कमी खर्चात होऊन १०% उत्पादनात वाढ होते . अशा प्रकारे वेळेवर पेरणी संरक्षीत पाण्याचा वापर , हेक्टरी रोपाची संख्या व महात्मा फुले कृषि विद्यापीठ संशोधन निष्कर्ष पंचसुत्रीचा वापर केला तर उपलब्ध साधन सामुग्रीचा वापर करून कमी खर्चात शाश्वत उत्पादन येण्यास मदत होते, तरी तृणधान्य राजा ज्वारीचे परांपरीक पद्धतीने लागवड करून उदाः हेक्टरी १० क्वि उत्पादन येत असेल तर या पंचसुत्रीच्या वापराने १८ ते १९ क्विं उत्पादनाचे निष्कर्ष आहेत तरी शेतकरी बांधवांना विनंती अहवान करण्यात येते की या पंचसुत्रीचा वापर करणे काळाची गरज आहे.
0 Comments