Hot Posts

6/recent/ticker-posts

विकसित भारत संकल्प यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयात शुभारंभ

विकसित भारत संकल्प यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयात शुभारंभ
२३ नोव्हेंबरला आंबेजवळगा येथून ग्रामीण यात्रेचा शुभारंभ

धाराशिव,दि २२ :  विकसित भारत संकल्प यात्रा " या मोहिमेचा शुभारंभ आज २२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते एल.ई.डी मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे,जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे,जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पुरूषोत्तम रुकमे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे म्हणाले की,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात नागरिकांना व लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती देण्यासाठी व पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांना  जनभागीदारीच्या माध्यमातून  योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.    

 जिल्ह्यात वेगवेगळ्या    माध्यमातून या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. आज या संकल्प यात्रेचा शुभारंभ एलईडी मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.जिल्ह्यात १२ एलईडी व्हॅन दररोज २ गावात योजनांचा प्रचार प्रसिद्धी आणि शासकीय योजना व त्यांच्या उपलब्धतेबाबत जागरूकता निर्माण करणार आहे. 

   विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम कालावधी दरम्यान " मेरी कहानी मेरी जुबानी " अंतर्गत योजनांबाबत लाभार्थ्यांचे मनोगत घेण्यात येईल.यात्रेदरम्यान विशेष कार्यक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.ग्रामपंचायत पातळीवर विविध विभागांमार्फत राबविलेल्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यासाठी येणाऱ्या अडचणी व त्रुटी दूर करून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी शिबिराचे आयोजन करून गावातच लाभ देण्यात येणार.यावेळी घरकुल लाभार्थ्यांचे भूमिपूजन व गृहप्रवेश, जल जीवन मिशन,प्रधानमंत्री पोषण अभियान,आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचे आणि पी आर कार्ड काढण्याचे मेळावे नियोजित असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे म्हणाले. 


२३ नोव्हेंबर रोजी धाराशिव तालुक्यातील आंबेजवळगा येथे सकाळी ९ वाजता ग्रामीणस्तरीय संकल्प यात्रेचा शुभारंभ जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते होणार आहे. सर्व ग्रामस्थांनी याप्रसंगी उपस्थित राहावे.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

0 Comments