Hot Posts

6/recent/ticker-posts

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ शेतीपूरक,विविध शेतीवर आधारित व्यवसायासाठी मिळणार अर्थसहाय्य

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ

शेतीपूरक,विविध शेतीवर आधारित व्यवसायासाठी मिळणार अर्थसहाय्य



धाराशिव,दि.७ : मातंग समाज व तत्सम 12 पोटजाती यामध्ये मांग,मातंग,मिनी मादीग, मादींग,दानखणी मांग,मांग महाशी, मदारी,राधेमांग,मांग गारुडी,मांग गारोडी,मादगी,मादिगा या जातीतील ज्या ज्या लोकांच्या नावे शेतजमीन आहे.याबाबतचा तपशील शासनास सादर करणे आवश्यक आहे.या माहितीच्या अनुषंगाने मातंग समाजातील व तत्सम पोटजातीतील ज्यांच्या नावे शेतजमीन आहे।अशा व्यक्तींची किंवा अर्जदाराची माहिती संकलित करुन त्या माहितीच्या आधारे शासनाकडे महामंडळामार्फत शेतीपूरक,विविध शेतीवर आधारित व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यासाठी योजना प्रस्तावित किंवा सादर करण्याकरीता माहितीची आवश्यकता आहे.

 तरी जिल्ह्यातील ज्यांच्या नावे शेतजमीन आहे.अशा मातंग समाजातील व तत्सम पोटजातीतील व्यक्तींनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत जवळ,जिल्हा कार्यालय, धाराशिव येथे 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मण क्षीरसागर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments