महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्रशाला तुळजापुर येथे आगळावेगळा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा
तुळजापुर: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्रशाला तुळजापूर येथील १९९९ या वर्षी दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शिंदे प्रशालेच्या प्रांगणात पार पडला. तब्बल २४ वर्षानंतर शाळेच्या प्रांगणात एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी गेट-टुगेदरची 'एक उनाड दिवस' अशी वेगळी संकल्पना ठेवली होती. ९० च्या दशकातील शालेय जीवनातील आठवणी जाग्या करण्यासाठी पहिल्या सत्रामध्ये गोट्या, भोवरा, क्रिकेट, विटी-दांडू, सायकली अशा वेगवेगळ्या खेळाचे साहित्य उपलब्ध करून देऊन वर्ग मित्रांनी शालेय जीवनातील खेळांचा आनंद घेतला. याच सत्रा मध्ये शाळेच्या मैदानावर लेमन गोळ्या, चॉकलेट, कुडमुडे आधी ९० च्या दशकात विद्यार्थी दशेत खाल्ले जाणारे पदार्थ उपलब्ध करून ठेवले होते.
दुसऱ्या सत्रामध्ये सर्वांनी माजी मुख्याध्यापक डी.बी. शिंदे सर, पी.पी. व्हरकट सर, बी.बी. सुतार सर, एस. एस. दाभाडे सर, एच. एच. रोचकरी सर, पी. एस. सरडे सर, मोकाशे सर, हंगरगेकर सर, जाधव मॅडम या माजी शिक्षकांचा सन्मानपत्र देऊन सन्मान केला. तिसऱ्या सत्रामध्ये सर्व मित्र-मैत्रिणींनी स्वतःची ओळख करून देऊन शालेय जीवनातला आठवणीतला एक प्रसंग कथित केला. स्नेह मेळाव्यासाठी संपूर्ण देशभर विविध क्षेत्रात कार्यरत असलेले तब्बल १२० मित्र मैत्रिणी हजर होते. भविष्यामध्ये काही सामाजिक उपक्रम हाती घेण्याचा संकल्प देखील या स्नेह मेळाव्यात करण्यात आला.
0 Comments