पान शॉपवर अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, धाराशिव शहर पोलीस ठाण्याची कामगिरी
धाराशिव : धाराशिव शहरातील दोन पान शॉप मध्ये अवैद्य गुटखा विक्री करणाऱ्या विरुद्ध करणाऱ्या विरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळाली सविस्तर माहिती अशी की पोलीस ठाणे :दि.22.11.2023 रोजी पोलीस निरीक्षक- उस्मान शेख धाराशिव पोलीस ठाणे यांना 11.30 ते 12.10 वा. सु. गोपनीय माहिती मिळाली की, सम्राट चौक धाराशिव येथे पोस्ट ऑफीस शेजारील तुळजाई पान शॉप व हतलाई पान शॉप नावाचे दोन शॉपमध्ये दोन इसम महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ गोवा गुटख्याच्या पुड्या अवैध्य विक्री करत आहे. यावर पथकाने लागलीच सदर ठिकाणी जाउन नमूद इसमास नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे- 1) मधुसुदन नवनाथ देवगिरे, वय 28 रा. सारोळा बु. ता. जि. धाराशिव, 2) दिपक हनुमंत गायकवाड, वय 22 वर्षे, रा. शिवाजी नगर माळी प्लॉटींग, तांबरी विभाग, लिंबोणी बाग धाराशिव ता. जि. धाराशिव असे सांगितले त्यांच्या कडे अधीक चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिल्याने पथकाने सदर पान शॉपची पाहणी केली. त्यामध्ये पान मसाला, सुगंधित तंबाखू, बादशाहा, गोवा गुटखा पान बहार विमल पान मसाला चे पाउच असा एकुण 5,472 ₹ किंमतीचा गुटखा साठवण करुन सदरचा गुटखा विक्री करण्यासाठी पान शॉपमध्ये ठेवलेला मिळून आल्याने त्याचा सविस्तर पंचनामा करुन माल जप्त करुन ताब्यात घेउन पान शॉप गुटखा विक्री करणारे 1) मधुसुदन नवनाथ देवगिरे, वय 28 रा. सारोळा बु. ता. जि. धाराशिव, 2) दिपक हनुमंत गायकवाड, वय 22 वर्षे, रा. शिवाजी नगर माळी प्लॉटींग, तांबरी विभाग, लिंबोणी बाग धाराशिव ता. जि. धाराशिव यांचेविरुध्द भा.दं.सं. कलम- 272, 273, 188, 328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2003 कलम 26(2)(1), 26 (2)(4), 27(3)(ई), 30(2), 59 अन्वये गुरंन 437/2023 असा गुन्हा धाराशिव शहर पो.ठाणे. येथे 22.11.2023 रोजी नोंदवला आहे.
सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी- पोलीस निरीक्षक श्री.उस्मान शेख, सपोनि- साळवे, धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदार यांचे पथकाने केली.
0 Comments