रस्ता अपघात : निष्काळजीपणे वाहन चालवण्याविरुद्ध ,तुळजापुर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल
तुळजापुर : तालुक्यातील तीर्थ खुर्द पाटी जवळ नळदृग तुळजापूर रोड वरून जात असताना मोटर सायकल चालकाने निष्काळजीपणे भरधाव वेगात मोटरसायकल चालवून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळाली सविस्तर माहिती अशी की, आरोपी नामे- अनिकेत आनंद देडे, सोबत मयत नामे- वैशाली आनंद देडे, वय 35 वर्षे, रा. मातंग नगर शुक्रवार पेठ तुळजापूर जि. धाराशिव हे दोघे दि. 02.10.2023 रोजी 18.30 वा. सु. तिर्थ खुर्द पाटीचे जवळ नळदुर्ग ते तुळजापूर रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 25 ए झेड 1519 वर बसून जात होते. दरम्यान अनिकेत देडे यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही भरधाव वेगावत निष्काळजीपणे चालवुन रोडवरील खड्यात आदळल्याने वैशाली देडे या मोटरसायकलवरुन खाली पडून आपघात होवून गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी- यशवंत संभाजी डोलारे, वय 50 वर्षे, रा. मसला खुर्द ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.24.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 304 (अ) सह मोवाका 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
0 Comments