धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडून येणार - मा.खा. रवींद्र गायकवाड
मा.खा.प्रा. रवींद्र गायकवाड यांची शिवसेना धाराशिव लोकसभेच्या संपर्क प्रमुख पदी निवड
पालकमंत्री डॉ तानाजी सावंत व मी हातात हात घालून जिल्हा विकासासाठी काम करणार
धाराशिव :- धाराशिव लोकसभा मतदारसंघातील ११ तालुक्यातील गाव वाडी वस्ती सर्व माझ्या ओळखीचे आहेत माझा संपर्क आहे, मी आजपासून कामाला लागलो आहे लोकसभा मतदारसंघातील सर्व गाव वाडी वस्ती मी पिंजून काढणार आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडून येणार असल्याची प्रतिक्रिया पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मा. खासदार रवींद्र गायकवाड यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना धाराशिव लोकसभेच्या संपर्क प्रमुख पदी माझी निवड केली आहे अशीच माहिती मा.खा.प्रा. रवींद्र गायकवाड यांनी शासकीय विश्रामगृह येथे आज दि २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांना दिली आहे. आज पासून संपर्क प्रमुख पदांची जबाबदारी स्वीकारुन कामाला सुरुवात करतो आज एकादशी व पांडुरंगाच्या आशिर्वादाने भविष्य काळात चांगले काम घळावे यासाठी आजच्या दिवस निवळला आहे. मी संप्रदायाला मानणारा आहे या दिवसांपेक्षा चांगला दिवस दुसरा कोणताही असु शकत नाही या साठी म्हणून आज पासून काम सुरू करत आहे असे मत मा.खासदार गायकवाड यांनी व्यक्त केले. यावेळी उमरगा- लोहारा- तुळजापूर जिल्हाप्रमुख मोहन पुनुरे, सह संपर्क प्रमुख अमर कदम,
कळंब-धाराशिव उपजिल्हा प्रमुख अनंत वाघमारे, धाराशिव तालुकाध्यक्ष अजित लाकाळ, कळंब तालुका अध्यक्ष लक्ष्मण हुलजुते, अभिमन्यू खराडे इत्यादी उपस्थित होते
राज्यामध्ये महायुती आघाडीचे सरकार आहे. धाराशिव लोकसभेची जागा निवडून आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्री यांनी माझ्यावर सोपवली आहे. ही जागा शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप कोणाला मिळणार आहे ठरलेले नाही वाटाघाटी करून भविष्यात ही जागा कोणाला मिळेल माहित नाही मात्र तिन्ही पक्षातील लोकांना एकत्र घेऊन या लोकसभेची जागा कशी शंभर टक्के निवडून आणता येईल यासाठी मी आजपासून कामाला लागलो आहे. प्रत्येक गावात शाखा उघडणार गावठी निहाय बैठक घेणार व पालकमंत्री डॉ तानाजी सावंत व मी हातात हात घालून जिल्हा विकासासाठी काम करणार अशी माहिती खा. गायकवाड यांनी दिली आहे.
0 Comments