Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने कृषी विभागामार्फत आयोजित मिलेट रॅली संपन्न

 धाराशिव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने कृषी विभागामार्फत आयोजित मिलेट रॅली संपन्न

धाराशिव: आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत कृषी विभागाच्या वतीने दिनांक सहा रोजी मिलेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. 2023 हे वर्ष जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय पौष्टिक वर्ष साजरी केली जात आहे. आहारातील त्णधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली पाहिजे हा प्रमुख हेतू आहे.

पौष्टिक तरुण धान्याचे महत्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विभागामार्फत जनजागृती रॅली केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या मिलेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये या मिलेट रॅलीला जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने, कृषी अधिकारी श्रीमती वर्षा मरवाळीकर कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर व श्रीमती शोभा कुलकर्णी जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ धाराशिव, श्री अभिमन्यू काशीद कृषी उपसंचालक , श्री महादेव असलकर उपविभागीय कृषी अधिकारी धाराशिव, श्री शुक्राचार्य भोसले उपविभागीय कृषी अधिकारी भूम, व तालुका कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत मिलेट रॅलीस हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.

या मिलेट रॅलीमध्ये कृषी विभागाचे 250 अधिकारी कर्मचारी व 100 शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅली ची सुरुवात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीपासून पुष्पक मंगल कार्यालय जिल्हा क्रीडा संकुल, जिल्हा अधिकारी कार्यालय व शेवट प्रशासकीय इमारत येथे झाला. रॅलीमध्ये पौष्टिक तृणधान्य आहाराचे महत्व वाढवण्याच्या अनुषंगाने पौष्टिक तृणधान्याच्या  विषयात अधिकारी व कर्मचारी होते. तसेच अधिकारी कर्मचारी व शालेय विद्यार्थी यांच्या हातामध्ये पौष्टिक त्रणधान्य विशद करणाऱ्या फलकांच्या माध्यमातून प्रचार व प्रसिद्धीच्या घोषणा देण्यात आल्या. ही रॅली संपन्न झाल्यानंतर उपस्थित सर्व नागरिक शालेय विद्यार्थी ,अधिकारी ,कर्मचारी, तसेच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना ज्वारीचा हुरडा, चटणी, राजगिरा व नाचणी लाडू अल्पोहार म्हणून देण्यात आला.

या रॅलीच्या माध्यमातून पौष्टिक तृणधान्य जसे की, ज्वारी, बाजरी ,नाचणी ,राळा ,भगर आधी धान्याचा दैनंदिन आहारात समावेश करावा असे आवाहन  रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले.

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.

Post a Comment

0 Comments