Hot Posts

6/recent/ticker-posts

दुचाकी वाहनांच्या नोंदणी क्रमांकासाठी MH25BB ही नवीन मालिका सुरु ११ व १२ डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावे|Applications for registration number of two-wheelers new series MH25BB should be submitted by December 11 and 12

दुचाकी  वाहनांच्या नोंदणी क्रमांकासाठी MH25BB ही नवीन मालिका सुरु ११ व १२ डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावे|
एकाच क्रमांकाचे दोन किंवा अधिक प्राप्त झालेल्या अर्जासाठी १३ डिसेंबर रोजी लिलाव


धाराशिव,दि.०७ :- धाराशिव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी MH25BB ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे.

वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते. त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो. बऱ्याचवेळा नागरीकांनाही याचा त्रास होतो. नागरीकांचा होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा. यासाठी ज्या वाहनचालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवे असतील त्यांनी 11 ते 12 डिसेंबर 2023 पर्यंत विहीत नमुन्यातील अर्ज भरुन कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजता या दरम्यान सादर करावेत. अर्जासोबत पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल. (उदा. आधारकार्ड, लाईट बील, टेलीफोन बील आदी.) तसेच आकर्षक क्रमांकासाठी देय असलेल्या विहीत शुल्काच्या डी.डी. अर्जासह जमा करणे बंधनकारक आहे. डी.डी.फक्त Deputy Regional Transport Officer, Dharashiv यांच्या नावे केवळ राष्ट्रीयकृत बँकेचा असावा. या व्यतिरिक्त इतर नावाचे डी.डी.बाद ठरवले जातील. तसेच डी.डी. व्यतिरिक्त बँकेने जारी केलेले बँकर्स चेक स्विकारले जाणार नाहीत. डी.डी.कमीत-कमी एक महिना मुदतीमधील असावा.

एकाच नंबरकरीता एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्यांची यादी 12 डिसेंबर रोजी संध्याकाळी  5 वाजता कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांना लिलावाकरीता जर अतिरिक्त रक्कमेचा डी.डी.जमा करावयाचा असेल तर त्यांनी 13 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावा. लिलावासाठी सादर केलेला अतिरिक्त रक्कमेचा डी.डी. रुपये 300 पेक्षा कमी नसावा. अतिरिक्त रक्कमेचे संबंधीत अर्जदारांकडून प्राप्त झालेले डी.डी.चे लिफाफे अर्जदार, प्रतिनिधी यांच्या समक्ष व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत उघडले जातील. ज्या अर्जदाराने अधिक रक्कमेचा डी.डी.सादर केला असेल त्यास सदरचा पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करुन वाहन क्रमांक प्राप्त करुन घ्यावा. अन्यथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी शासनजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही.

आकर्षक तसेच पसंतीच्या क्रमांकासाठीचे विहीत नमुन्यातील अर्ज तसेच प्रतिनिधी येणार असल्यास प्रतिनिधीचे प्राधिकारपत्र याचा नमुना कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध आहे. असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments