काक्रंबा येथील शिक्षक श्री राम व्यंकट भोसले यांची तुळजापुर तालुका खाजगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पतसंस्था संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सत्कार
धाराशिव : तुळजापूर तालुका खाजगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतपुरवठा संस्था मर्यादित तुळजापूरची पंचवार्षिक निवडणूक सलग चौथ्यांदा बिनविरोध करण्यात आली.
या संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संस्थेचे सभासद सहशिक्षक विजय मोरे, चंद्रकांत साळुंखे, हरी जाधव, रामपुरे आर. के. शिंदे एस एस,शेख जब्बार,तम्मा सोलापुरे, फाटे भागवत, बसवराज मडोळे, मोहन माने,सूळ, श्रीमती बिराजदार एल. के., पाटील(मोरे)आर.बी., सूर्यवंशी के.एस.,गहिनीनाथ काळे,जाधव संजय, खान जी.जे., भाऊसाहेब पांढरे, आनंद कांबळे, नितीन पाटील, दंतकाळे, श्रीमती दत्तू मॅडम आदींनी पुढाकार घेतला होता. त्याबद्दल संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांनी सर्वांचे आभार मानले.
काक्रंब्यातील भोसले यांच्या निवडीबद्दल सत्कार
तुळजापूर तालुका खाजगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतपुरवठा संस्थेच्या बिनविरोध झालेल्या निवडणुकीत तुळजापूर तालुक्यातील संजीवनी माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक राम व्यंकट भोसले यांची वर्णी लागल्याबद्दल संजीवनी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक देवगुंडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार व फेटा बांधून यथोचित सत्कार करण्यात आला.
0 Comments