गैरहजर व स्थलांतरित मतदार यादीतील मतदारांनी १८ डिसेंबरपर्यंत सुनावणीस पुरावे किंवा म्हणणे दाखल करावे
धाराशिव दि.14 : धाराशिव तालुक्यातील ज्या मतदारांचे नाव तालुक्यातील 362 यादी भागांमध्ये समाविष्ट आहे,अशा सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की,भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार सद्यस्थितीला संपुर्ण धाराशिव जिल्हयामध्ये मतदार पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार धाराशिव तालुक्यामध्ये 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर मतदारांचे छायाचित्रासह पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला आहे.
या पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना गैरहजर,स्थलांतरीत,मयत,दुबार असे मतदार या यादी भागामध्ये आढळून आले आहेत.
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 व मतदार नोंदणी नियम 1960 मधील कलमान्वये जे मतदार गैरहजर,स्थलांतरीत,मयत व दुबार आढळून आलेले आहेत,अशा मतदारांचे नाव वगळण्याकरिता त्यांना त्यांच्या मतदार यादीतील पत्त्यावर नोटीस बजावणी करण्यात आली आहे.
संबंधित मतदाराचा सर्वसाधारण रहिवास मागील 6 महिन्यापासून त्या पत्त्यावर राहात नसल्यामुळे मतदाराला नोटीस प्राप्त न झाल्याने त्याने आपले लेखी म्हणणे सादर करण्याची अंतिम संधी मिळावी यासाठी हे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
धाराशिव तालुक्यातील गैरहजर, स्थलांतरीत मतदारांची यादी गांव पातळीवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडून तसेच विशेष ग्रामसभा घेऊन मतदार यादीचे वाचन करून जाहीर प्रसिद्धी देण्यात आली असून त्याची प्रत जिल्हा संकेतस्थळ www.osmanabad.gov.in यावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
परंतु अद्यापही अनेक मतदार सुनावणीसाठी हजर झाले नसल्याचे निर्दशनास आल्यामुळे मतदार नोंदणी अधिकारी धाराशिव -कळंब तथा उपविभागीय अधिकारी कळंब धाराशिव यांनी या तालुक्यातील सर्व मतदारांना जाहीर आवाहन करून ज्या मतदारांची नावे गैरहजर, स्थलांतरीत मतदारांच्या यादीमध्ये समाविष्ट आहेत,त्यांनी तहसिल कार्यालय धाराशिव येथे वैयक्तिकरित्या अथवा प्राधिकृत प्रतिनिधी मार्फत 18 डिसेंबर 2023 पर्यंत हजर राहून रहिवासी पुरावे व म्हणणे दाखल करावे.मतदारांसाठी ही सुनावणीची अंतिम संधी आहे.याची सर्व मतदारांनी गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी.
0 Comments