Hot Posts

6/recent/ticker-posts

अवैधरीतीने मुरूम उत्खन करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी आमरण उपोषण भोसगा मोड येथील साठवण तलावातील मुरुम

अवैधरीतीने मुरूम उत्खन करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी आमरण उपोषण

भोसगा मोड येथील साठवण तलावातील मुरुम



धाराशिव दि.२८ (प्रतिनिधी) - लोहारा तालुक्यातील भोसगा मोड येथील साठवण तलावातून अवैधरित्या मुरूम उत्खनन करणाऱ्या वाल्वो कंपनी, संबंधित मंडळाधिकारी व तहसिलदार यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा रामभाऊ गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.२८ डिसेंबरपासून आमरण  उपोषण सुरु केले आहे.

लोहारा तालुक्यातील भोसगा मोड येथील साठवण तलावातून कुठल्याही प्रकाकारची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे मुरमाचे उत्खनन मागील महिन्यापासून रात्र व दिवस सुरू आहे. त्यासाठी वाल्वो कंपनीचे २ पोकलेन आणि टाटा कंपनीचे ४ हायवा (वाहन नंबर एमएच- १२ व्हीएफ- १०५४, एमएच- १२ व्हीएफ- १०५३, एमएच- १२ व्हीएफ- १०५५, एमएच- १२ टिव्ही- ७२०७ ) या वाहनांच्या सहाय्याने रात्रंदिवस तलावामधील मुरुमाचे उत्खनन करीत आहेत. ते उत्खननाचे काम हे शासनाचे तलाठी, मंडळ अधिकारी व तहसिलदार यांच्या सहकार्याने चालू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून निलंबित करावे. तर संबंधित उत्खनन करीत असलेल्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच त्यासाठी वापरण्यात आलेली मशनरी तात्काळ जप्त करून शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी. विशेष म्हणजे हे काम करीत असताना शासनाचा महसूल चुकवून काम सुरू असल्यामुळे तो महसूल देखील वसूल करण्यात यावा या मागणीसाठी हे आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ते रामभाऊ गायकवाड यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांना जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव, विकास बनसोडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कुंदन वाघमारे, धाराशिव युवा तालुकाध्यक्ष सागर चंदनशिवे, उमरगा तालुका उपाध्यक्ष नेताजी गायकवाड, वैभव कांबळे, विकास गायकवाड, सहसचिव सोमनाथ नागटिळक, रितेश कांबळे व शिवाजी गायकवाड आदींनी पाठींबा दिला आहे.




Post a Comment

0 Comments