धाराशिव जिल्ह्यात कोरोनाचा J1 व्हेरियंटचा शिरकाव, यंत्रणा सतर्क, जिल्हाधिकारी यांचे नागरिकांना आवाहन
धाराशिव : कोरोनाचा पुन्हा एकदा धाराशिव जिल्ह्यात शिरकाव झाला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. हा नवीन कोरोनाचा J1व्हेंरीयटचा तुळजापूर तालुक्यात रुग्ण आढळला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली आहे. तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई गावात राहणाऱ्या एका १४ वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाली असून या मुलाला तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय ठेवले असून त्याची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी केले आहे.
0 Comments