अरफात काझी व समीर खतीब यांच्यासह उस्मानाबाद शहारातील मुस्लिम युवकांचा राष्ट्रवादी मध्ये (अजित दादा गट) जाहीर प्रवेश
धाराशिव: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव येथे (दि.24 ) प्रदेश उपाध्यक्ष मा. सुरेश दाजी बिराजदार आणि धाराशिव- उस्मानाबाद चे जिल्हाध्यक्ष मा.महेंद्र काका धुरगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस मा.खलील पठाण यांच्या नेतृत्त्वाखाली धाराशिव - उस्मानाबाद शहरातील अरफात शफीक काझी व समीर कलीम खतीब यांच्यासह शहारातील मुस्लिम युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार गट ) पार्टी मध्ये जाहीर प्रवेश झाला.
अरफात काझी हे शहर उपाध्यक्ष व समीर खतीब हे युवक शहर उपाध्यक्षपदी मा.शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी गटामध्ये सक्रिय पदाधिकारी होते. अरफात काझी व समीर खतीब यांच्याबरोबर अरबाज शेख, अरमान शेख, अल्बक्ष शेख, आयन शेख, अफ्फाल बागवान, मुजाहिद शेख, जाहिद सय्यद, सकलेल बागवान, अन्वर पठाण, इमरान पल्ला, साजिद पठाण, शहाबाज पठाण, फसी भौया काझी, मुल्ला फरहान, काझी शहजाद, शेख निहाल, काझी शफियोद्दीन,समी काझी, बिलाल काझी, मसूद काझी,रेहान सत्तर शेख,जुबेर शेख,अरहान काझी,शाहरुख खान अरअश काझी,आदिक काझी या युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गटामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.या शहरातील युवकांच्या पक्षप्रवेशामुळे उस्मानाबाद शहरातील (अजितदादा पवार साहेब गट) पक्षाची ताकद वाढलेली दिसून येते.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे, अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस खलील पठाण, शहराध्यक्ष सचिन तावडे, कळंब धाराशिव विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे,युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, युवक जिल्हा सरचिटणीस शमसोद्दीन जमादार, तुळजापुर युवक तालुकाध्यक्ष नितीन आबा रोचकरी, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने आदी पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.
या पक्ष प्रवेशावेळी प्रदेश उपाध्यक्ष मा.सुरेश दाजी बिराजदार तसेच जिल्हाध्यक्ष मा.महेंद्र काका धुरगुडे यांच्या वतीने यांचा सत्कार करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस मा.खलील पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम युवकांचा पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश झाला यावेळी त्यांनी पक्षप्रवेश झालेल्या युवकांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments