उमरगा : गुंजोटी येथील अवैध कत्तलखान्यावर छापा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
धाराशिव : जिल्हृयाचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धाराशिवचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, पोलीस ठाणे उमरगा हद्दीतील गुंजोटी येथे जनावरांची अवैध कत्तल होत आहे यावरुन पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांचे आदेशावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शैलेश पवार, पोलीस हावलदार- प्रकाश औताडे, विनोद जानराव, शौकत पठाण, पोलीस नाईक/ नितीन जाधवर, चालक पोलीस हावलदार- महेबुब अरब व QRT यांचे पथक हे दि.13.12.2023 रोजी 22.10 41पोलीस ठाणे उमरगा हद्दीतील गुंजोटी येथे कुरेशी गल्लीत अवैध कत्तल खान्यावर जनावरांची अवैध कत्तल होत आहे अशी खात्री लायक बातमी मिळाल्यावरुन पथकाने लागलीच त्याठिकाणी जावून छापा कारवाई केली असता सदर ठिकाणी काही इसम मिळून आले असता त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव-1)असलम मोहम्मद कुरेशी, वय 34 वर्षे, 2) इम्रान जहीर कुरेशी, वय 25 वर्षे, 3) इरफान मजहर कुरेशी, वय 22 वर्षे तिघेही रा. दर्गा रोड कुरेशी गल्ली गुंजोटी ता. उमरगा जि. धाराशिव असे सागिंतले. त्याठिकाणी मिळून आलेल्या जनावरा बाबत त्यांचे कडे चौकशी केली त्यांनी सदर जनावरे ही कत्तली करीता आणल्याचे सागिंतले.
सदर ठिकाणी अवैध कत्तल करण्याकरीता बांधलेले 06 बैल, 02 म्हैस, 08 रेडे, 02 रेडकु, 03 गोवंशीय वासरे व कत्तल केलेल्या जनावरांची 4 शिंगे अशी एकुण 5,26,000₹ किंमतीचे जनावरे हे नमुद आरोपीच्या ताब्यात मिळून आले ते जप्त करण्यात आले आहे. नमुद आरोपी यांचे विरुध्द उमरगा पोलीस ठाणे गुरनं 660/2023 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 2015 कलम 5,5(ब) सह प्राण्याना निर्दयतेने वागवणे अधिनियम 1960 कलम 11 अन्वये गुन्हा दाखल आहे.
0 Comments