तुळजापुर : जुनी पेन्शन योजनेसाठी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संप, यामध्ये तुळजापुर नगरपरिषद कर्मचाऱ्यांचाही सहभाग
तुळजापुर : राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे . यामध्ये तुळजापूर नगरपरिषद कर्मचारीही सामील झाले होते. आंदोलनकर्त्यांनी प्रमुख मागणी असलेली जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यची मागणी करत राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. यात महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्यावतीने दिनांक 13/12/2024 रोजी सायंकाळी 9.00 वाजता संपूर्ण राज्य / विभाग / जिल्हा कार्यकारिणी यांची संयुक्त गूगल मिटिंग आयोजित करण्यात आली होती. मीटिंग मध्ये सर्व जिल्हा/विभाग/राज्य स्तरावरील पदाधिकारी यांनी आपली मत मांडली. सदरील मिटिंगमध्ये एकमताने संपास जाहीर पाठिंबा घोषित करून उद्या पासून काळ्या फिती लावून कार्यालयीन कामकाजात सहभागी व्हावे.अशी भूमिका घेण्यात आलेली होती तसेच पुढील बेमुदत संपा बाबतची इतर सर्व महत्वाच्या संघटनांची भूमिका जाणून घेऊन त्यापद्धतीने सक्रिय सहभाग नोंदविण्या संदर्भात 2.3 दिवसात निर्णय घेण्यात येईल, असेही ठरले आहे. तसेच, स्थानिक पातळीवर परिस्थिती नुसार पालिका कार्यकारिणी/ जिल्हा कार्यकारिणी संप अनुरूप निर्णय सक्षम असतील. त्या निर्णयास संघटनेचा पूर्ण पाठींबा असेल.असे राज्य कार्यकारिणी,महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना यांनी कळविले असल्यामुळे आज दिनांक 14/12/2023 रोजी तुळजापूर न.प.कर्मचारी यांनी काळया फिती लावून कामकाज केले व संपास पाठींबा दिला आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री.दत्ता साळूंके, श्री.वैभव पाठक, श्री.शिवरत्न अतकरे,श्री.बापू रोचकरी, श्री.नागेश काळे, श्री.प्रमोद भोजने , श्री.राजू सातपुते, श्री.विकास दनाने, श्री.आण्णा पारधे,श्रीमती प्रफुल्लता बरुरकर, श्रीमती शोभा कांबळे इ.कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments