राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परंडा(अजित दादा पवार गट) शहराध्यक्ष पदी जावेद पठाण तर परंडा अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी जहांगीर शेख यांची नियुक्ती
धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार साहेब गट) च्या परांडा शहराध्यक्षपदी जावेद गौस खां पठाण यांची नियुक्ती करण्यात आली तसेच अल्पसंख्यांक परंडा तालुकाध्यक्ष या पदी जहांगीर गौस शेख यांची नियुक्तीचे पत्र जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे (दि.15) राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.महेंद्र काका धुरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा शहराध्यक्षपदी जावेद गौस खां पठाण यांची नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली तसेच भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप यांच्या उपस्थितीमध्ये अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी जहांगीर शेख यांची नियुक्ती करण्यात आली. पदाधिकारी यांनी निवड झाल्यावर आपण तालुका तसेच संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची गाव पातळीवर संघटनात्मक बांधणी करून आपले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार साहेब यांचे नेतृत्व अधिक बळकट करू असा विश्वास व्यक्त केला. यांच्या निवडीनंतर त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे, भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप, धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे, परंडा तालुकाध्यक्ष अमोल काळे,सामाजिक न्याय विभाग सेल जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक सेल जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, केशेगाव जि.प.गटप्रमुख लिंबराज लोखंडे,नितीन कांबळे आदी पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.
0 Comments