Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यातील फुलवाडी येथील नागनाथ महाराज यात्रेस आज पासून प्रारंभ, यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तुळजापुर तालुक्यातील फुलवाडी येथील श्री नागनाथ महाराज  यात्रेस आज पासून प्रारंभ, यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन


धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी येथील जागृती देवस्थान म्हणून प्रसिद्ध व अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री नागनाथ महाराज यात्रेस आज मंगळवारी (दि.१२) पासून सुरुवात होत आहे.यानिमित्ताने दोन दिवस विविध धार्मिक विधी व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

फुलवाडी येथील जागृत देवस्थान श्री नागनाथ महाराज यात्रा दरवर्षी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साहात साजरी करण्यात येते परंपरेनुसार यात मंगळवारी (दि.१२) पहाटे ४ ते ९ यावेळेत श्री च्या मूर्तीस अभिषेक,महापूजा,महाआरती.दिवसभर नवस फेडणे, दंडवत घेणे आदी कार्यक्रम असतील.सायंकाळी ६ ते १० यावेळेत 'श्री' ची पालखी मिरवणूक व मानाच्या नंदीध्वजची मिरवणूक तर रात्री १० वाजता भजनाचा व भारुडाचा कार्यक्रम  होणार आहे.बुधवारी (दि.१३) सकाळी ७ वाजता 'श्री' ची पालखी मिरवणूक,नंदीध्वज मिरवणूक व अग्नी प्रवेश कार्यक्रम होणार आहेत.यात्रेच्या दोन्ही दिवशी महाप्रसादाचे व्यवस्था करण्यात आली आहे.यात्रेनिमित्ताने मंदिर रंगरंगोटी व मंदिर परिसरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी यात्रोत्सवातील विविध धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान मंदिर कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे .यात्रेकरूंच्या सोयीसाठी ग्रामपंचायत कार्यालय,नागनाथ महाराज कमिटी व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments