कृषी विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा संपन्न
धाराशिव: लोहारा येथे कृषी विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती लोहारा यांच्या संयुक्त विद्यमानाने लोहारा येथे आज दिनांक 11 डिसेंबर 2023 शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी व कृषी विभागामार्फत असणाऱ्या शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा या शेतकरी मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. याकरिता पंचायत समिती कृषी अधिकारी मुळे साहेब यांनी उपस्थितांना कार्यक्रमाबाबत प्रस्तावना केली.तालुका कृषी अधिकारी लोहारा श्री तारलकर साहेब यांनी महाडीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांना विविध योजना व त्यांचा लाभ कसा घेता येईल याबाबत विचार मांडले तर युनायटेड वे मुंबई अंतर्गत सुरू असलेल्या जलसंजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी श्री समीर शेख यांनी शेतमालाचे काढणी पश्चात नियोजन व मूल्य साखळी साठी कृषी विभाग अंतर्गत सुरू असलेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना यासंदर्भात उपस्थित सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या शेतकरी मेळाव्यासाठी लोहारा तालुक्यातील बहुसंख्य पुरुष व महिला शेतकरी उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.
0 Comments