Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील चिवरी परिसरात रानडुकराच्या उपद्रवाने शेतकरी वैतागला

तुळजापुर तालुक्यातील चिवरी परिसरात रानडुकराच्या उपद्रवाने शेतकरी वैतागला, वन विभागाने रानडुकरांचा  बंदोबस्त करण्याची होत आहे शेतकऱ्यातुन मागणी



धाराशिव:  तुळजापुर तालुक्यातील चिवरी परिसरातील शेतशिवारात रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकरी अतिशय वैतागला आहे, सध्या रब्बी हंगामातील नाजूक पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू असताना रानडुक्कर उभ्या पिकाचे नुकसान करून नासधूस करीत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवावर आले आहे..रक्ताचे पाणी करून शेतकरी आज शेती करीत आहेत. अशात मात्र ऐनवेळी वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी झाल्यास कर्जबाजारी झालेला शेतकरी आणखीच कर्जाच्या खाईत जात आहे . येथील शेतकरी बाबासाहेब बलसुरे,देवराव बलसुरे यांच्या सात एकर क्षेत्रावरील ज्वारीची एका रात्रीमध्ये रानडुकरांनी नासाडी केली आहे. परिसरातील शेतकऱ्यांना या वन्यप्राण्यापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी रात्रभर जागून काढावी लागत आहे . पिकांची नासाडी होत असल्यामुळे परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे .परिसरात यंदा अत्यल्प कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी ज्वारी पिकांकडे वळले आहेत. परंतु पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेतच रानडुकरांकडुन  संपूर्ण पीकाची नासाडी केली असल्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला जात आहे. परिणामी शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे .या परिसरातील शेतकऱ्यांना मागील सात ते आठ वर्षापासून या वन्य प्राण्यांचा त्रास होत आहे, एकंदरीत यंदा  एकीकडे पावसाची अनियमता आणि त्यातच शेतशिवारात रानडुकरांच्या उपद्रवाने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे त्यामुळे संबंधित वन विभागाने या प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे .


Post a Comment

0 Comments