Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव निमित्त जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंम्बासे व मुख्याधिकारी नगर परिषद श्रीमती वसुंधरा फड यांच्या हस्ते प्रतिमा पुजन

श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव निमित्त जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंम्बासे व मुख्याधिकारी नगर परिषद श्रीमती वसुंधरा फड यांच्या हस्ते प्रतिमा पुजन

धाराशिव:  तेली समाजाचे आराध्य दैवत संताजी जगनाडे महाराज यांच्या 399 व्या जयंती निमित्त   शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी  श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे.या कार्यक्रमास धाराशिव जिल्हयाचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंम्बासे,नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती वसुंधरा फड यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व महाराजांना अभिवादन करण्यात येणार आहे.तसेच सर्व धाराशिव जिल्ह्यातील समाज बांधव पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की शुक्रवार दिनांक 8 डिसेंबरला सकाळी ११ वाजता संताजी जगनाडे महाराज चौक ,जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर धाराशिव येथे जगनाडे महाराजांना अभिवादन करण्याकरिता उपस्थित रहावे ही विनंती असे आवाहन धाराशिव जिल्हा तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments