Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव : अपघातातील मयत पोलीस अंमलदार यांचे वारसास ॲक्सेस बॅकेची 1 कोटीची मदत

धाराशिव : अपघातातील मयत पोलीस अंमलदार यांचे वारसास ॲक्सेस बॅकेची 1 कोटीची मदत


धाराशिव : जिल्हा पोलीस दलाच्या आस्थपनेवरील कळंब पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले पोलीस हावलदार अमोल रामलिंग कुंभार हे दि. 12.07.2023 रोजी कर्तव्यावार असताना दुचाकीवरुन जाताना अपघात झाला होता. त्या अपघातात पोलीस हावलदार अमोल रामलिंग कुंभार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचार कामी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा दि. 24.09.2023 रोजी मृत्यु झाला होता. सदर मयत पोलीस हावलदार यांना ॲक्सीस बॅकेच्या वतीने पोलीसांचे पगार खात्याला असलेल्या अपघाती विमा संरक्षण योजने अंतर्गत  एक (1) कोटी रुपये मयत यांचे वारसास मंजुर करण्यात आले आहेत. त्यापैकी आज दि. 19.01.2024 रोजी मयत पोलीस हावलदार यांची पत्नी श्रीमती श्रीदेवी अमोल कुंभार व मुलांना अत्यआवश्यक खर्च व शिक्षणाची तरतुद म्हणून 38 लाख रुपयाचा धनादेश मा. पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आला. यासाठी मा. पोलीस अधीक्षक यांनी ॲक्सीस बॅक धाराशिव शाखेकडे सतत पाठपुरावा केला होता.

यावेळी धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री अतुल कुलकर्णी, पोलीस उप अधीक्षक (गृह) मा. श्री सदाशिव शेलार तसेच घनश्याम चंढक प्लस्टर हेड ॲक्सेस बॅक शाखा सोलापूर, गुरुसिध्द हिरोळे, शाखा अधिकारी ॲक्सेस बॅक धाराशिव, सुमय्या शेख, उप शाखा अधिकारी ॲक्सेस बॅक धाराशिव शाखा हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments